जन्मतारीख: ५ सप्टेंबर
शिक्षण: IAS Officer
लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातले मुरूम.
* मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्सी ही पदवी व कोल्हापूर विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली.
* त्यानंतर त्यांनी बंगलोरमधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला.
* भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते निवृत्त झाले.
* प्रशासकीय अधिकारी असताना प्रत्येक प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने आणि न्यायबुद्धीने सोडवला त्यातूनच त्यांच्या साहित्यकृती आकार घेत गेल्या.
* बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी
* स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो.
* 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे.
* सहा कादंबऱ्या, आठ कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत.
लक्ष्मीकांत देशमुख हे 'अक्षर अयान' या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत
*** लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
* गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ पुरस्कार (२५-१-२०१८)
* २०१० साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलानचे अध्यक्षपद
* नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या ३८वे मराठवाडा साहित्य संमेलनस्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
* सांगली येथे झालेल्या पहिल्या लोकजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
* नांदेड येथे झालेल्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
* बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* 'पाणी!! पाणी!!' आणि 'सावित्रीच्या गर्भातमारलेल्या लेकी' या पुस्तकांना मराठवाडा साहित्य पुरस्कार.
*** महाराष्ट्र साहित्य पुरस्कार
* महाराष्ट् फाऊंडेशन पुरस्कार
* टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर ॲवॉर्ड
* महाराष्ट्र सरकारचा आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार