इंजिनीयर कुशल दस्तेनवर हे मूळचे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील बेल्लद बागेवाडी इथले रहिवासी. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली पदवी आणि एमबीए केल्यानंतर त्यांनी थरमॅक्स आणि इतर भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जबाबदारीच्या पदांवर काम केले. पुणे, हैदराबाद व बेंगळुरू येथील सेवेनंतर त्यांची नेमणूक त्यांच्या कंपनीतर्फे प्रथम जर्मनीमध्ये आणि नंतर फ्रान्स मध्ये झाली.
गेली सोळा वर्षे ते âफ्रान्समध्ये पॅरिसच्या उपनगरात कुटुंबासह स्थायिक आहेत. सध्या ते कॅप जेमिनी या बहुराष्ट्रीय कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट (इंडस्ट्रियल अँड कन्झ्यूमर व्हर्टिकल) या उच्च पदावर कार्यरत आहेत. पत्नी अश्विनी (आता दिवंगत) आणि अथर्व व आदि हे दोन मुलगे असा त्यांचा परिवार आहे.
ब्रेन ट्यूमरने पत्नीचे अकाली निधन झाल्यानंतर, तिच्या शेवटच्या काळातील हृदय आठवणी गुंफणारे त्यांचे हे पुस्तक, हा लेखनाचा त्यांचा पहिलाच प्रयत्न. माणसाच्या आयुष्याचा नेमका अर्थ आणि उद्देश काय याचा सखोल विचारही त्यांचे हे लेखन करते