मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात लेखक, दिग्दर्शक व गीतकार म्हणून लक्षणीय कारकिर्द.
'नवा गडी नवं राज्य', 'दोन स्पेशल', 'आज्जीबाई जोरात' या संस्मरणीय नाट्यकृतींचे लेखन.
'डबल सीट', 'YZ', 'फास्टर फेणे, 'धुरळा', 'टाइम प्लीज' यांसारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे लेखन.
हिंदी मनोरंजनसृष्टीत नावाजल्या गेलेल्या 'ताली' या वेबसिरीजचे लेखन.
मराठी व हिंदी भाषेतील ७० चित्रपटांसाठी १३०हून अधिक गीतांचे लेखन.
तीन वेळा 'फिल्मफेअर पुरस्कार', 'मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार', 'झी चित्रगौरव', 'झी नाट्यगौरव', 'म.टा. सन्मान', गदिमा प्रतिष्ठानचा 'चैत्रबन पुरस्कार', 'स्टार प्रवाह रत्न', 'लोकसत्ता तरुण तेजांकित' या आणि अशा अनेकविध प्रतिष्ठित पुरस्कारांचे मानकरी.
अप्रकाशित नाटके 'नवा गडी नवं राज्य', 'सगळे उभे आहेत', 'दोन स्पेशल', 'आजीबाई जोरात !'
प्रकाशित कवितासंग्रह 'आधी नींद, आधा ख्वाब' (हिंदी)