 
        
                किशोरी आमोणकर :
जन्म :  (१० एप्रिल १९३२ - ३ एप्रिल २०१७) एक भारतीय शास्त्रीय गायिका होत्या.
*  जयपूर घराण्याशी संबंधित होती , किंवा विशिष्ट संगीत शैली सामायिक करणाऱ्या संगीतकारांच्या समुदायाशी संबंधित होती.  त्या  भारतातील अग्रगण्य शास्त्रीय गायिका मानल्या जातात. 
*  किशोरी आमोणकर  शास्त्रीय शैलीतील ख्याल आणि हलकी शास्त्रीय शैलीतील ठुमरी आणि भजनाची कलाकार होत्या. 
आमोणकर यांनी त्यांच्या आई, शास्त्रीय गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्या हातून जयपूर घराण्यातून प्रशिक्षण घेतले , परंतु त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या गायन शैलींचे प्रयोग केले.
*  भेंडी बाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले . त्यानंतर त्यांनी अनेक घराण्याकडून गायनाचे धडे घेतले. 
*  किशोरीताईंनी १९६४  साली गित गाया पत्थरोनें या चित्रपटासाठी गाणं गायलं. त्यानंतर त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. 
*  १९९०  मध्ये त्यांनी ‘दृष्टी’ या सिनेमासाठी पार्श्वगायन केलं. किशोरीताईंनी संगीतक्षेत्रात अनेक शिष्य घडवले. 
*  देशपरदेशातील अनेक मैफलींमध्ये गायन. 
***  किशोरी आमोणकर यांची गाजलेली गाणी : 
*  सहेला रे आ मिल जाए 
*  अवघा रंग एक झाला 
*  बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल 
*  माझे माहेर पंढरी 
*  हे श्यामसुंदर राजसा 
*  अवचिता परिमळु 
*  कानडा विठ्ठल 
*  सुखसोयरा सुखाचा विसांवा 
***  पुरस्कार : 
*  संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९८५
*  पद्मभूषण पुरस्कार,१९८७
*  संगीत सम्राज्ञी पुरस्कार, १९९७
*  संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, २०००
*  पद्मविभूषण पुरस्कार, २००२ 
*  संगीत नाटक अकादमी फेलोशिप, २००९
            
 
                             
      
                                