फारुक एस. काझी सांगोला येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहास आणि शिक्षणशास्त्रात एम.ए. केलं असून डी.एड., बी.एड., डी.एस.एम. इ. पदव्या संपादन केल्या आहेत.
* बालसाहित्य हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून पालकत्वावरही ते नियमित लेखन करतात. मराठी बालसाहित्यात उपेक्षित राहिलेल्या समाजाच्या जाणिवा, परिसर, भावभावना त्यांनी आपल्या कथांतून मांडताना बालकथांचा एक नवीन अनुबंध आकारास आणला आहे.
* तात्पर्य देणारे, संस्कार करणारे लेखन टाळून मुलांना वाचनाचा आनंद देणारे आणि वाचताना त्यांना प्रश्न पडतील, ते विचार करतील आणि स्वत: काही शोधून काढतील असं साहित्य निर्माण करण्यास ते आग्रही आहेत.
*** प्रकाशित साहित्य :
* शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन
* दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर राज्य पुरस्कार
* बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर राज्य पुरस्कार
* ग्रंथालय संघ, सांगोला पुरस्कार
* मित्र (बालसाहित्य) ऋग्वेद प्रकाशन, आजरा (कोल्हापूर)
* स्नेहप्रभा तौर प्रयोगशील साहित्य राज्य पुरस्कार
* प्रिय अब्बू (बालसाहित्य) ऋग्वेद प्रकाशन, आजरा (कोल्हापूर)
* मसाप, सिन्नर (नाशिक) उत्कृष्ट साहित्य राज्य पुरस्कार
* तू माझी चुटकी आहेस आणि इतर कथा - रोहन प्रकाशन
* सूर्यांश साहित्य संस्था, चंद्रपूर चा राज्य पुरस्कार २०१९-२०
* चित्र आणि इतर कथा - रोहन प्रकाशन, पुणे
* चुटकीचं जग (किशोर-कुमार कादंबरी) मेहता पब्लिशिंग हाउस
* जादुई दरवाजे - राजहंस प्रकाशन, पुणे
* कोकोची डायरी - सप्तर्षी प्रकाशन.
* मुलांसाठी काही कविता - कविता कार्डस
* शहाण्या बाबाची कहाणी - हरिती प्रकाशन ,पुणे
*** अनुवादित साहित्य
* भीतर कानिकेच्या मगरींच्या गोष्टी - नमन प्रकाशन, दिल्ली
* मी मोठी होईन तेव्हा - प्रथम बुक्स, बेगळूरू
* शिंजीर दिवसभर का बरं खात राहतो ? प्रथम बुक्स बेंगलूरू
* आनंद - प्रथम बुक्स बेंगलूरू
* ए हाड नावाचा कुत्रा - प्रथम बुक्स बेंगलूरू
* SCERT,पुणे साठी अकरा पुस्तकांचा अनुवाद केला आहे.
*** लेखन
* किशोर, वयम, चिकूपिकू, ऋग्वेद, मुलांचे मासिक, रानवारा, झंप्या, पालकनीती इ. मासिकांतून सातत्याने लेखन.
* लोकसत्ता, लोकमत, सकाळ, सामना, महाराष्ट्र टाईम्स, दिव्य मराठी, पुण्यनगरी, नवशक्ती इ. वर्तमान पत्रांतून मुलांसाठी, पालकांसाठी लेखन.
* ऋग्वेद मासिक, आजरा संपादक सदस्य.
*** इतर
* रूम टू रीड साठी मुद्रितशोधनाचा अनुभव.
* आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून मुलाखत प्रसिद्ध
* मुलांसाठी लिहिताना या पालक-शिक्षक-शिक्षण कार्यकर्ते यांच्यासाठीच्या बालकथा लेखन कार्यशाळेचे आयोजन
* डी. के. शेख यांच्या दखनी भाषेतील बालकवितांच्या 'मेरी कवितायें' या कवितासंग्रहाचे संपादन व चित्रे
* दै. सकाळ मधून पालनगोष्टी हे पालकत्वावरील सदर प्रसिद्ध २०२३
* दै. एग्रोवन मधून मशागत हे ललित लेखनपर सदर प्रसिद्ध होत आहे. (जानेवारी २०२४ पासून)
*** गौरव
* महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक व व्दैभाषिक पाठ्यपुस्तक इयत्ता दुसरी भाग २ मध्ये बालभारती कडून चिमणीच पत्र या पाठाची निवड (२०२१)
* चुटकीचं जग या किशोर कादंबरीचा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या एम.ए. मराठी (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमात समावेश २०२३
* मुंबई विद्यापीठ अंतर्गत असणा-या गोगटे कॉलेज, रत्नागिरी (स्वायत्त) यांच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात 'रोजा' या कथेचा समावेश २०२३
* बालभारतीच्या 'किशोर' मासिकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात, ५० वर्षातील ५० निवडक कथांमध्ये 'हा रस्ता आमचाही आहे' या कथेचा समावेश.