* १९६१ मध्वैये द्यकीय पदवी मुंबई मेडिकल कॉलेजमधून घेतल्यानंतर ते ब्रिटनला गेले.तेथे त्यांनी एनएचएस प्रतिष्ठानमध्ये काम केले. त्या काळात एनएचएससारख्या संस्थांमध्ये काम करणे अभिमानास्पद मानण्यात येत. ५ वर्षे तेथे राहून त्यांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला व प्रशिक्षणही घेतले. त्यानंतर ते मुंबईला परतले. विलेपार्ले येथे प्रॅक्टिस करू लागले.
* १९७९ मध्ये त्यांच्या ध्यानात आले की ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब जडतो. जर्मन वैज्ञानिकाने यावर संशोधन केले होते. त्याच्याकडून डॉ. ओक यांनी दस्तऐवज मागवले. त्याच काळात त्यांच्या घरासमोर गिरणीच्या परिसरात एक औद्योगिक युनिट उभारले. डॉ. ओक यांनी यामुळे ध्वनिप्रदूषण होईल अशी तक्रार केली. लोकवस्तीच्या ठिकाणी हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेरीस त्या औद्योगिक युनिटचा परवाना रद्द करण्यात आला.
* १९८५ मध्ये त्यांनी आपल्या डॉक्टर व वकील मित्रांसोबत मिळून गणेशोत्सवादरम्यान लावण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली. रात्री ११ नंतर ते बंद केले जावेत, अशी मागणी केली.
* अखेरीस निर्णय डॉ. ओकांच्या बाजूने लागला. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत प्रथमच ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर १ लाख रुपये दंड व ५ वर्षे कैद अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली. देशात अशा प्रकारचा कायदा अंमलात येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांच्याच याचिकेवर २००३ मध्ये ध्वनिप्रदूषणासाठी २००० च्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली.
* ध्वनिप्रदूषणाविरुध्द भारतातील लढ्याची मुहूर्तमेढ रोवणारा कृतीशील कार्यकर्ता.