डॉ. शुचिता नांदापूरकर - फडके
** या गेली तेरा वर्षे (२०१२ पासून) अनुवाद क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या मराठी-इंग्रजी या भाषांत कामा करतात. इंग्रजीतून मराठीमध्ये त्यांचे काम अधिक झाले आहे. मातृभाषेची सहजता तिथे कामी येते, असे त्यांना वाटते.
** ज्या क्षेत्रात आपण काम करतो, त्यातील सखोल ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने "अनुवादशास्त्र मांडणी आणि व्यवस्थापन" या विषयात त्यांनी विद्या वाचस्पती पदवी प्राप्त केली आहे. श्री. प्र. चिं. शेजवलकर सर त्याना मार्गदर्शक लाभले होते.
** मुलात हाडाच्या शिक्षिका असल्याने, जिथे काळात नाही तिथे त्या विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याकडे त्यांचा कला असतो. अनुवाद करताना त्यांना विध्याचे वावडे नाही. ललित लेखन अनुवाद करताना त्या सर्वाधिका आनंदी असतात.
** आजवर त्यांनी पुण्यातील बव्हांश नामवंत प्रकाशकांसाठी अनुवाद केला असून, त्यांच्या अनुवादित पुस्तकांची संख्या ११५ तर प्रकाशित पुस्तकांची संख्या ९५ आहे.
** अनुवादात अडचण आल्यास मूळ लेखकाशी चर्चा करून शंका निरसन करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे हे लेखकही त्यांच्याशी जोडले गेले आहेत.
** केवळ अनुवाद करून न थांबता त्यातील व्याकरण, शुद्धलेखन, मुद्रितशोधन अशा पुस्तक रूपाशी संबंधित प्रत्येक आयाम अचूक करण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्यासाठी त्या अनेकदा पदरमोड करतात, मुद्दाम वेळ काढतात.
** त्यांनी ज्यांचे अनुवाद केले आहेत त्यात - पावलो कोएल्हो, शोभा दे, श्री. एम, गौर गोपाला दास, नंदन निलेकणी, आनंद निळकंठन, नरेंद्र गोइदानी, कविता काणे, एलिफ शफाक, मिच अल्बम, जिम क्विक, मेल रोबिन्स, डॅनियल काहनेमन, विक्रम अंडे, निलेश कुलकर्णी, पेरूमल मुरुगन, शेक्सपियर इत्यादी नामवंत लेखकांचा समावेश आहे.
** बालसाहित्यात त्यांनी ३६ पुस्तकांचा संच अनुवादित केला आहे.
** 'तुझ्या सवे,' शुभमंगल, ही स्व-लिखित (सहयोग) तर असाध्य ते साध्य हे त्यांनी शब्दांकित केलेले पुस्तक आहे.
** तूर्तास त्या आपल्या या क्षेत्रातील अनुभवाचा लाभ इतरांना मिळावा या हेतुस्त्व ८-१० अनुवादकांच्या चमूला मार्गदर्शन करत आहेत.