एम. डी.(मेडिसीन) एम.ए.एस्सी. (कायचिकित्सा) संधिवात तज्ज्ञ (-हुर्मॅटाॅलाॅजिस्ट)
* एम.डी.मेडिसीन (१९८२) मुंबई विद्यापीठ)
* १९८४ पासून पुण्यात वैद्यकीय व्यवसाय.
* जहांगीर, पूना आणि संचेती रुग्णालयात संधिवाततज्ज्ञ. यापूर्वी भारती, दीनानाथ आणि रुउबी या रुग्णालयात संधिवाततज्ज्ञ.
* जी. एस. मेडिकल कॉलेज (मुंबई) युरोपियन लीग अगेन्सस्ट र्हमॅटिझम. इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच अनेक आंतरराष्ट्रीय कार्यशाळांतून संधीवाताचे प्रशिक्षण.
* लहान मुलांचे संधिवात, हाडांचा विरळपणा,सिस्टेमिक लुपस (SLE) सॉफ्ट टिश्यू र्हमॅटिझम या आजारांचे विशेष प्रशिक्षण.
* संधिवातविषयक अनेक लेख तसेच शोधनिबंध प्रसिध्द. पुस्तकातही प्रकरणे.
* आमवात, संधिवात, मणक्यांचा आमवात इत्यादी अनेक विषयांसंबंधी आंतरराष्ट्रीय संशोधनात सहभाग. संशोधनाचे विशेष प्रशिक्षण. सर्वोत्तम वैद्यकीय संशोधकाचे नामांकन (२००९,२०११)
* अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग तसेच सत्रांचे अध्यक्षपद.
* संधीवाताच्या रुग्णांची वैद्यकीय माहिती नोंदवण्यासाठी नव्या संगणक प्रणालीची (सॉफ्टवेअर) निर्मिती.
* संधिवाताच्या रुग्णांसाठी इंग्रजी व मराठी भाषेत शास्त्रीय माहिती देणा-या भारतातल्या सर्वात मोठ्या संकेतस्थळाची निर्मिती (www.arthritis-india.com).
* संधिवातविषयक जनजागृतीसाठी अनेक व्याख्याने तसेच विद्यार्थी आणि डॉक्टरांना प्रशिक्षण.
* क्या फौउंडेशन (Know Your Arthritis-KYA Foundation-) जनजागृती आणि प्रशिक्षणासाठीच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.
*** आयुर्वेद
* मास्टर ऑफ आयुर्वेदिक सायन्सेस (कार्यचिकित्सा) -पुणे विद्यापीठ, फेलो ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिसीन
* तारांचद, नानाल तसेच साने गुरुजी रुग्णालयात पूर्वी मानद चिकित्सक.
* टिळक आयुर्वेद महाविद्यालय, डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय; तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, येथे अध्यापन तसेच पदव्युत्तर (एम.डी. आणि पी.एच.डी.) मार्गदर्शन.
* विविध विषयांवर लेख, शोधनिबंध तसेच पाठ्यपुस्तकात प्रकरण.
* आंतरराष्ट्रीय आर्युवेदभूषण,, सर्वोत्तम संशोधन मार्गदर्शक तसेच युरोपियन आयुर्वेद ॲकॅडमीचा आयुर्वेद वारिधी पुरस्कार.
*** इतर
* हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (संगीत अलंकार) नावारागा निर्मिती (यश नारायण) ग्वाल्हेर गायकीसंबंधी पुस्तिका, गान नारायण या पुस्तकाचे संपादन, कंठसाधनेचा अभ्यास, सुगम संगीत (विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे तसेच कार्यक्रमांचे आयोजन व सहभाग), म्युझिक थेरपी असोसिएशन संस्थापक सदस्य.
* योग - योग विद्यापीठाच्या पदविकेसाठी नियमित अभ्यास. संधिवातासाठी योग या विषयाचे अध्ययन.