Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Home / Authors / Dr .Rewa Dubhashi | डॉ. रेवा दुभाषी
Dr .Rewa Dubhashi | डॉ. रेवा दुभाषी
Dr .Rewa Dubhashi | डॉ. रेवा दुभाषी

गोव्यातील नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. रेवा गेली बारा वर्षे फोंडा गोवा येथे खासगी वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. तत्पूर्वी केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात विविध इस्पितळांत त्यांनी कार्यानुभव घेतला आहे.

'पाळी आणि बरेच काही' या त्यांच्या स्त्री-आरोग्यविषयक पुस्तकाला गोवा आणि महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळाला असून त्याची दुसरी आवृत्तीही निघाली आहे.

सदर पुस्तकाला पुण्याच्या 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चा प्रतिष्ठेचा 'सुषमाताई शिरोळे' पुरस्कार, तसेच गोव्याच्या 'शारदा प्रतिष्ठान' या नामांकित संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे.

डॉ. रेवा यांनी ललित लेखनात आपला ठसा उमटवला असून त्यांना विविध कथा आणि कविता स्पर्धांत पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

२०२२च्या 'मौज' दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या 'अबोलीची वेणी' या ललित लेखासाठी त्यांना पुण्याच्या 'साहित्यप्रेमी भगिनी मंडळा'चा उत्कृष्ट ललित लेखाचा पुरस्कार मिळाला आहे.

'मौज' व 'हंस' या दिवाळी अंकांतून त्यांचे ललित लेखन वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे.

Dr .Rewa Dubhashi | डॉ. रेवा दुभाषी ह्यांची पुस्तके