डॉ. पुष्पा खरे
* या उत्कल विश्वविद्यालयात प्रोफेसरच्या पदावरून २०११ मध्ये सेवानिवृत्त झाल्या.
* या टाटा मूल भूत अनुसंधान केंद्र (TIFR), मुंबई येथील डॉक्टरेट असून उत्कल विश्वविद्याल य, भुवनेश्वर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी क्वेसार, गुरुत्वीयभिंगे व विश्वउत्पत्तिशास्त्र यावर शोधकार्य केले आहे.
* निवृत्तीनंतर काही वर्षे त्या आयुका IUCAA; Inter University Centre for Astronomy and Astrophysics) मध्ये CSIR मानद वैज्ञानिक होत्या. त्यांनी विदेशातील अनेक विश्वविद्याल यांत अध्यापन आणि संशोधनकार्य केले आहे. त्या विज्ञान लोकप्रिय करण्याच्या अनेक उपक्रमांत सक्रीय आहेत.
* पुष्पा खरे यांनी जयंत नारळीकर यांच्या दोन हिंदी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे. दोन्ही अनुवाद राजहंस प्रकाशन ने प्रकाशित केले आहेत. त्यांनी नारळीकरांच्या एका मराठी पुस्तकाचा हिंदीत अनुवाद केला आहे जो छत्तीसगड राज्य हिंदी ग्रंथ अकादमीने प्रकाशित केला आहे.
* याशिवाय पुष्पा खरे यांनी, अजित केंभावी यांची बरोबर गुरुत्वीय तरंग : विश्व दर्शनाचे नवे साधन ह्या पुस्तकाचे लेखन केले आहे.
राजहंस प्रकाशन व्दारा प्रकाशित ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच ग्रंथोत्तेज्ज्क समितीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
* गुरुत्वीय तरंग : विश्व दर्शनाचे नवे साधन या पुस्तकाची विस्तारित आवृत्ती इंग्रजीत लिहिली आहे जी SPRINGER NATURE या संस्थेने प्रकाशित केली आहे.