
Dr. Parimal Maya Sudhakar | डॉ. परिमल माया सुधाकर
डॉ. परिमल माया सुधाकर हे पुणे-स्थित एमआयटी स्कुल ऑफ गवर्नमेंट इथे सहयोगी प्राध्यापक आहेत.
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा इथे शालेय शिक्षण आणि अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून राज्यशास्त्रात स्नातक पदवी मिळवली.
परिमल यांनी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून 'आंतरराष्ट्रीय संबंधांत एम.ए. आणि पुढे चीनच्या अभ्यासावर एम. फिल आणि पीएच डी प्राप्त केली.
त्यांना जेएनयु च्या विद्यार्थी संघात अनुक्रमे संयुक्त सचिव आणि उपाध्यक्ष म्हणून निर्वाचित होण्याचा मान मिळाला आहे.
त्यांनी तरुण भारत (नागपुर), देशोन्नती, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी व सकाळ या वृत्तपत्रांतून आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमीत लेखन केले आहे.