Home / Authors / Dr. Mrudula Dadhe | डॉ. मृदुला दाढे
Dr. Mrudula Dadhe | डॉ. मृदुला दाढे
Dr. Mrudula Dadhe | डॉ. मृदुला दाढे

• प्रा डॉ मृदुला दाढे . (जन्म १९ जानेवारी १९६९ ,पुणे )
• बी. ए. (मानसशास्त्र)
• *एम ए, पीएच .डी (संगीत)
• *प्राध्यापक, संगीत विभाग, मुंबई विद्यापीठ.

• शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण गुरू श्री दसककर ,पं गजाननबुवा जोशी आणि एस के अभ्यंकर, डॉ आशा पारसनीस जोशी, पं मधुकरबुवा जोशी, यांच्याकडे. श्रीमती योजना शिवानंद, श्रीमती मधुवंती दीक्षित, कै. बाळ बरवे यांचेही मार्गदर्शन लाभले. आवाजसाधना शास्त्राचे धडे कै .जयंत करंदीकर (अहमदनगर) यांच्याकडून घेतले. पीएच. डी साठी कै.डॉ.चारूशीला दिवेकर , आणि डॉ नीरा ग्रोव्हर यांचे मार्गदर्शन लाभले.

• उर्दू उच्चार ,गझल गायकीचे खास शिक्षण (मरहूम) उस्ताद इकबाल गिल यांच्याकडे.
• एक प्रथितयश गायिका म्हणून ४० वर्षांची यशस्वी कारकीर्द*
• पहिली मोठी संधी - स्मरणयात्रा ,जागतिक मराठी परिषद १९९०. दिग्दर्शक सुधीर मोघे,आनंद मोडक.
• स्वरांकन ,अक्षय गाणी,सरींवर सरी (विनायक जोशी) ओंकार स्वरूपा (सुरेश वाडकर श्रीधर फडके ) हे गाजलेले कार्यक्रम .
• अनेक चित्रपटांना पार्श्वगायन*
• संजय लीला भन्साळी कृत *देवदास* या चित्रपटात शास्त्रीय आलाप गायन*
• हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार या विषयावर एस एन डी टी विद्यापीठाने 2009 साली *पीएच .डी (विद्या वाचस्पती)* ही पदवी दिली आहे.
• आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन प्रबंध सादर झाले आहेत ,त्याची प्रशंसा करण्यात आलेली आहे।
• दूरदर्शन,आकाशवाणी साठी सातत्याने कार्यक्रम सादर।
• 'तरी असेल गीत हे 'ही तेरा भागांची मराठी संगीतकारांच्या शैली उलगडून दाखवणारी मालिका आकाशवाणी मुंबई साठी लिहिली आणि सादर केली
• नक्षत्रांचे देणे( श्रीनिवास खळे ) -अल्फा मराठी या कार्यक्रमातील कामगिरी विशेष गाजली.
• रहे ना रहे हम हे storitel ॲप वर ऑडियो बुक स्वरूपात मृदुला जींच्या आवाजात उपलब्ध.
• लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांमध्ये सतत संगीतविषयक लिखाण.
• मौज, अक्षरधारा , लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स, ऋतुरंग,मनशक्ती,रुपेरी,तारांगण ,स्वरप्रतिभा ,दृष्टी श्रुती (डिजिटल ) अशा अनेक दिवाळी अंकांसाठी सातत्याने लेखन.
• *रहें ना रहें हम या पुस्तकाला अनंत फंदी पुरस्कार*
• *ललित संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी साठी स्वरानंद प्रतिष्ठान पुणे यांचा ‘उषा अत्रे वाघ’ पुरस्कार. चतुरंग प्रतिष्ठानचा ‘कला गौरव’ पुरस्कार
• मन्ना डे यांच्या हस्ते रोटरी क्लबचा vocational Excellence पुरस्कार

*** इतर अनेक पुरस्कार
• डॉ अभय बंग,डॉ जब्बार पटेल,डॉ अरुणा ढेरे आदि मान्यवरांनी लिखाणाची प्रशंसा केली आहे.
• *लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम, यांनी संशोधनाची खास दखल घेऊन त्यांच्या कार्यक्रमासाठी संहिता लिहिण्यासाठी आमंत्रण दिले,आणि अशा अनेक संहिता लिहिल्या.
• अमेरिका,(BMM कॉन्व्हेंशन)दुबई,मस्कत,कुवेत,अशा अनेक देशांत यशस्वी कार्यक्रम।
• मृदुलाजींनी सुगम संगीतात अनेक उत्तम विद्यार्थी तयार केले आहेत जे रियालिटी शो मध्ये चमकत आहेत.सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही विद्यार्थी पीएच.डी करत आहेत.
• रहें ना रहें हम या पुस्तकाच्या यशानंतर या लेखनावर आधारित, याच नावाचा कार्यक्रम सादर करतात. श्रोत्यांची प्रामुख्याने ‘चित्रपट संगीतविषयक जाण वाढवणे’ ही एक चळवळ मृदुलाजी चालवतात, त्यालाच अनुसरून अमरलता ,(भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गायकीवर सप्रयोग व्याख्यान) साहिरनामा ,(साहिर लुधियानवी )याद ना जाये (शैलेन्द्र )असे अनेक कार्यक्रम रसिकांची सर्वत्र दाद मिळवत आहेत.
• अफसाना लिख रही हूं हे पुस्तक नुकतेच डॉ अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशित.
• नुकतीच,महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला संचालनालयातर्फे राज्य पुरस्कार निवड समितीमध्ये सन्माननीय अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती.

• मोबाईल MD Productions ७०२१४४१८१०
• ई-मेल mruduladadhe@gmail.com
• वेबसाईट www.mruduladadhe.com

Dr. Mrudula Dadhe | डॉ. मृदुला दाढे ह्यांची पुस्तके