*** विज्ञानशिक्षक, संशोधक, विज्ञानलेखक म्हणून मुख्यत: काम केलेल्या प्रा. डॉ. मिलिंद वाटवे यांनी निसर्ग, विज्ञान आणि ललित साहित्यात मोजकी पण मोलाची भर घातली आहे.
* त्यांच्या आरण्यक या पुस्तकाला १९९४-९५ सालचा उत्कृष्ट वाड्मय निर्मिती महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त आहे.
* निसर्ग या विषयात लालित्य आणि विज्ञान हातात हात धरून चालतात आणि याचा पुरेपूर वापर करून वाटवे यांनी चांगल्या पुस्तकांची निर्मिती केली; एवढंच नाही तर निसर्ग विषयक लिहिणा-या अनेक लेखकांसाठी एक प्रेरणास्थान निर्माण केले.
* १९८५ ते १९८९ या काळात "आपली सृष्टी आपले धन" ही चार खंडांची मालिका संपादित केली.
* त्यानंतर थोड्याच वर्षांत मदुमलाईच्या जंगलातील आपल्या अनुभवांवर आधारित "आरण्यक" ही दैनिक सकाळ मधील लेखमाला नंतर पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. या सर्व पुस्तकांनी तरुण पिढीला निसर्गप्रेमी बनविण्यात महत्वाची भूमिका बजावली.
* अनेक विज्ञान नियतकालिकांमधून शंभराहून अधिक शोधनिबंध आणि एक इंग्रजी पुस्तक Springer प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले. एक मराठी, एक उर्दू कविता संग्रह ही प्रसिद्ध झाले.
*** प्रकाशित साहित्य
* मधुमेह :बिन साखरेची थिअरी
* नर-मादी ते स्त्री-पुरुष
वरील दोन्ही पुस्तके सकाळ प्रकाशनाने प्रसिध्द केली.
* कट्टा मॉडेल हे राजहंस प्रकाशनाने प्रसिध्द केले असून ते म्हटलं तर विज्ञान, म्हटलं तर शैक्षणिक मानसशास्त्र, म्हटलं तर आत्मचरित्र. त्यात गंभीर वैज्ञानिक तत्वांबरोबर कुठे नर्म विनोद, कुठे टवाळपणा, कुठे उपहास, कुठे सडेतोड टीका आणि त्याबरोबर स्वत:चा आणि विद्यार्थ्यांचा भावनिक प्रवास अशी सर्व अंगे आहेत.