ठाणे जिल्ह्यात डॉ. जयंत पाटील यांनी केलेले शेतीचे नवे प्रयोग आणि आदिवासींच्या जीवनातले आमूलाग्र बदल वाचून नवी उमेद मिळून जाते. अजूनही वेळ गेलेली नाही...हा आशावाद जागा होतो. कृषी विषयाची पदवी घेऊन आपल्या परिसरात भक्कम पाय रोवून तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावणार्Zया या साधकाला सलाम करावासा वाटतो आणि म्हणूनच त्यांचे हे पुस्तक आत्मचरित्र न राहता, कार्यचरित्र होऊन जातं.
शेतकरी कुटुंबातील श्यामराव पाटील यांनी मुलाला शेतीची पदवी घेतल्यानंतर १९४९ साली गावातच राहण्याचा संदेश दिला. स्वत: स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीजींवरची निष्ठा यामुळे श्यामराव पाटील यांना विकासाचा मार्ग घरातूनच सुरू करायचा होता. गांधीजी-शिवाजी हे दुसऱ्याच्या घरात जन्मावेत, अशी मानसिकता असणा-या देशात अ०का शेतकर्याने यानं पदवीधर मुलाला शेती आणि परिसराच्या उन्नतीसाठी गावातच थांबवावं, ही क्रांतीच म्हणायला हवी...
' शेतीच्या कार्यात साधक म्हणून भूमिका ठेव. कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नकोस', हा वडिलांचा उपदेश शिरसावंद्य मानून पाटलांनी गेली पंचावन्न वर्ष शेतीला विज्ञनाची जोड देत जे काही केले, त्याला तोड नाही. मुख्य म्हणजे आदिवासींच्या जीवनात त्यांनी विकासाची व उमेदीची नवी पहाट जागवली. खरंतर या अ०काच कार्यानं ते खूप मोठे होऊ शकले असते. पण त्याहीपेक्षा आपल्या ज्ञनाचा आणि प्रयोगांचा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्व शेतकर्Zयांना फायदा झाला पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. म्हणूनच ज्येष्ठ शेतीशास्त्रज्ञ अ०मअ०स स्वामीनाथन यांची शाबासकीची थाप तर पडलीच शिवाय स्वामीनाथन जेव्हा जेव्हा परदेशात गेले आणि त्यांना नवं काही गवसलं, त्याचा भारतातील पहिला प्रयोग करण्यासाठी जयंत पाटील यांची आठवण झाली. हा या साधकाचा मोठा विजय म्हणायला हवा...
अन्नधान्याच्या शेतीला फलोत्पादनाची जोड दिली तर फळे व भाजीविक्रीतून रोख पैसा मिळतो व कुटुंबाची क्रयशक्ती वाढते, हे पाटील यांनी कोसबाड कऋषी शिक्षण संस्थेच्या परिसरातच नव्हे तर जिल्हाभरातील आदिवासींच्या शेतांवर नवनवे प्रयोग व प्रात्यक्षिके करून सिद्ध केले. मुख्य म्हणजे हे प्रयोग राज्यभर जावेत म्हणून शेतकर्Zयांना आमंत्रित केले आणि त्यांना बोलावून फक्त लेक्चरबाजी केली नाही; तर बियाणं, कलमं पुरवली. डहाणू परिसरातील जे आदिवासी दुसर्Zयाच्या शेतावर मजुरी करत. तेच आता स्वत: बागायतदार झाले, हे पाटील यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळं आहे.