शिक्षण :B.V.Sc. & Animal Husbandry
* मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्याल यातून पशुवैद्यक पदवी आणि विकृतीशाधक (Pathology)) या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण.
* गेली पन्नास वर्षे सर्व प्रकारच्या जनावरांवर उपचार करण्याचा अनुभव.
* सीबा-गायगी या औषधकंपनीच्या गोरेगाव, मुंबई येथील संशोधनकेंद्रात बावीस वर्षे औषधीसंशोधनपर कार्य.
* इ.स. २००० मध्ये निवृत्त झाल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रांत सामाजिक कार्य आणि अनेक शाळांमध्ये विविध विषयांत मुलांना मार्गदर्शन.
* चित्रकला हा छंद
* २०१६ पासून किशोर ह्या मुलांच्या प्रसिध्द होणा-या मासिकात लेखन करीत आहेत..
*** प्रकाशित साहित्य :
* अरब-इस्रायल संघर्ष हे पुस्तक स्नेहल प्रकाशन पुणे यांनी ९ डिसेंबर २०१४ मध्ये प्रकाशित केले.
* पशुवैद्याची रोजनिशी हे पुस्तक राजहंस प्रकाशन या संस्थेने २९ एप्रिल २०१६ रोजी प्रकाशित केले आहे.
* म्हणी आणि वाक्यप्रचार हे पुस्तक मराठी भाषा दिनी राजहंस प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केले.
*** पुरस्कार :
* अरब-इस्राईल संघर्ष या पुस्तकाला ग्रंथालय भारती, नागपूर या संस्थेचा समाजप्रबोधनपर साहित्य पुरस्कार - २०१५ प्राप्त झाला.
*** इतर
* अभिनयाची आवड असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघात डॉ. जोशी यांनी, पत्नी सौ. चित्रा जोशी यांच्याबरोबर काही नाट्यप्रवेश सादर केले आहेत.
* म्हणी आणि वाक्यप्रचार रंजक पद्धतीने सांगण्याचाही कार्यक्रम काही वर्षांपासून करीत आहेत.
* डॉ. अरुण जोशी हे २०१८ पासून कॉथरूड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक कार्य करीत आहेत.