अपर्णा संत यांनी श्री. बैरागी बुवा, श्री. प्रभाकर जोग, श्रीमती वसुमती भागवत यांच्याकडे कोरेगाव आणि सातारा येथे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. काही काळ विदुषी अनुराधा कुबेर यांच्याकडेही शास्त्रीय संगीताचे शिक्षण आणि डॉ. संजय उपाध्ये यांच्याकडे उच्चारशास्त्राचे प्रशिक्षण घेतले.
गेली सुमारे ३४ वर्षे त्या भावसंगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्योत्स्ना भोळे, गजाननराव वाटवे, अरुण दाते, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, श्रीधर फडके, मुकुंद फणसळकर, सलील कुलकर्णी, स्वप्निल बांदोडकर अशा नामवंत कलाकारांसोबत त्यांनी गाण्यांचे कार्यक्रम केले आहेत. आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, अनिल विश्वास, ओ. पी. नय्यर आणि सुमन कल्याणपूर या दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांनी आपली गायनकला सादर केली आहे.
सन १९९९ पासून 'मल्हार अॅकॅडमी ऑफ म्यूझिक' या स्वतःच्या संस्थेतर्फे त्या सुगम संगीताचे आणि ओंकार-साधनेचे प्रशिक्षणवर्ग घेतात.,.......