* अमृतांशु नेरूरकर यांनी संगणक अभियांत्रिकी विषयातील पदवी मुंबई विद्यापीठातून तर माहिती व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण आय.आय.टी. मुंबई येथून पूर्ण केले आहे.
* त्यांना आय.आय.टी. मुंबईकडून पदव्युतर शिक्षणातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.
* त्यांना सॉफ्टवेअर व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत, युरोप व अमेरिकेतील जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत १८ वर्षांचा दांडगा अनुभव आहे.
* भारतीय केंद्र व राज्य शासने तसेच संयुक्त राष्ट्र व इतर आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर माहिती तंत्रज्ञान सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे.
* लेखक सध्या इंटेल या मायक्रोप्रोसेसर चिपचा आराखडा व उत्पादन करणा-या आघाडीच्या अमेरिकी डिजिटल कंपनीमध्ये व्यवस्थापकीय पदावर कार्यरत आहेत.
* लेखन / साहित्याच्या दृष्टीकोनातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ओपन सोर्स, गोपनीयता व विदासुरक्षा तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांवर मराठी व इंग्रजीमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे.
* तसेच आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रांमध्येही सहभाग घेतला आहे. या विषयांवर आधारलेल्या व लोकसत्ता २०१८ व २०२१ मध्ये प्रसिध्द झालेल्या साप्ताहिक लेखमाला वाचक प्रिय ठरल्या.
* आपला संगणक व मोबाईल फोनचा आधारस्तंभ असलेल्या "इंटिग्रेटेड सर्किट" किंवा सेमिकंडक्टर चिपचे तंत्रज्ञान व निर्मितीचा इतिहास सोप्या शब्दात उलगडून सांगणारी व या तंत्रज्ञानाचा सामाजिक परिणामांचे विश्लेषण करणारी "चिप-चरित्र" ही नवी लेखमाला लोकसत्तामध्ये २०२४ सालापासून सुरु झाली आहे.
* डिजिटल युगात वावरणा-या सामान्य मराठी वाचकाला हे तंत्रज्ञान आत्मसात करणे सोपे जावे या हेतूने लेखकाने या विषयाच्या अनुषंगाने मराठीत विपुल लेखन केले आहे.