अ.रा. ऊर्फ अनंत रामचंद्र कुलकर्णी हे एक इतिहास संशोधक होते. ते पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे संस्थापक प्रमुख तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरूही होते.
* अ.रा. कुलकर्णी यांच्या प्रयत्नामुळे डेक्कन महाविद्यालयाशी संलग्न असलेला इतिहास विभाग इ.स. १९६९ साली पुणे विद्यापीठात आला. तेव्हापासून इ.स. १९८८ पर्यंत अ.रा. या विभागाचे प्रमुख होते.
* कुलकर्णी मूळचे सोलापूर जिल्ह्यातील. मुंबई विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्या वेळेसचे 'मराठवाडा विद्यापीठ' (सद्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), औरंगाबाद येथून त्यांनी पीएच. डी. घेतली. इतिहास संशोधनासाठी ते लंडनच्या 'स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रीकन स्टडीज', जर्मनीतील हायडलबर्ग आणि पॅरिस येथेही गेले होते. लंडनमधील संशोधनाच्या आधारे त्यांनी ग्रॅंट डफ याच्यावरील ग्रंथाचे लेखन केले.
ग्रंथसंपदा - मराठी
* शिवकालीन महाराष्ट्र , १९९३
* अशी होती शिवशाही , १९९९
* पुण्याचे पेशवे , १९९९
* कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी) , २००२
* जेम्स कनिंगहॅम ग्रॅट डफ , २००६
* जेधे शकावली करीना , २००७
* आज्ञापत्र , २००३
* मध्ययुगीन महाराष्ट्र
* मराठे व महाराष्ट्र , २००७
* गेले ते दिन , २००६
* मराठ्यांचे इतिहासकार (इतिहासलेखन पद्धती) , २००७
* परशराम चरित्र (सहसंपादक - नरेंद्र वागळे)
* पेशव्यांची बखर (सहसंपादक - वि.म.कुलकर्णी, अ.ना.देशपांडे)
* मराठ्यांचा इतिहास खंड १ (सहसंपादक - गणेश हरी खरे)
* मराठ्यांचा इतिहास खंड २ (सहसंपादक - गणेश हरी खरे)
* मराठ्यांचा इतिहास खंड ३ (सहसंपादक - गणेश हरी खरे)
* महाराष्ट्र : समाज आणि संस्कृती
* मेस्तर चारलस डोयवा साहेब फ्रान्सीस
* मराठ्यांचा इतिहास : साधन परिचय (सहसंपादक - म.रा.कुलकर्णी, )
* महात्मा जोतीराव फुले